Ad will apear here
Next
महावृक्षारोपण अभियानाअंतर्गत एक लक्ष वृक्ष लागवड
प्रातिनिधिक फोटोठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने शिळ येथील खरीवली देवी मंदिरात महावृक्षारोपण अभियानाअंतर्गत एक लक्ष वृक्ष लागवडीच्या उपक्रमाचा शुभारंभ एक जुलै रोजी होणार आहे. सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री, व ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि महापौर मीनाक्षी राजेंद्र शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व महापालिका आयुक्त व अध्यक्ष (वृक्ष प्राधिकरण) संजीव जयस्वाल यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे.

या कार्यक्रमासाठी सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आली आहे. 

या कार्यक्रमाच्या ठिकाणी जाण्या-येण्याकरिता वाहनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ही वाहने ठाणे महानगरपालिका मुख्यालयात सकाळी साडेआठ वाजता उपलब्ध असतील.

या दोन्ही वाहनांचे क्रमांक आणि चालकांची नावे अशी
- स्कॉर्पिओ (MH 04-P-8112). चालकाचे नाव : अशोक बाबर – ९००४४ ५७१२९
- इनोव्हा (MH 04-EF-1100). चालकाचे नाव : रूपेश कीर – ९८१९८ ०२४०३

दिवस : एक जुलै २०१७
वेळ : सकाळी दहा वाजता
स्थळ : शिळ येथील खरीवली देवी मंदीराजवळ वन विभागाच्या मोकळ्या जागेवर, ठाणे
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EYSKBD
Similar Posts
महावृक्षारोपण अभियानांतर्गत तीन लाख वृक्ष लागवडीचा ठाणे महानगरपालिकेचा संकल्प ठाणे : महाराष्ट्र सरकारने वन विभागाच्या माध्यमातून २०१७मध्ये एक जुलै ते सात जुलै या कालावधीत चार कोटी वृक्ष लावण्याचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्याअंतर्गत ठाणे महानगरपालिकेच्या वतीने चालू वर्षात एकूण तीन लाख वृक्ष लागवड करण्याचे नियोजन केले असून, त्यापैकी दोन लाख वृक्ष वनविकास महामंडळ या तज्ज्ञ संस्थेकडून लावण्यात येणार आहेत
ठाणे महानगरपालिकेचा वृक्षारोपण कार्यक्रम ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या एक लाख वृक्षारोपण कार्यक्रमाचा प्रारंभ राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यार हस्ते व महापौर मीनाक्षी राजेंद्र शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत एक जुलै रोजी शीळ येथे करण्यात आला
नारायणराव कोळी यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन ठाणे : ठाण्याचे माजी नगराध्यक्ष स्वर्गीय नारायणराव गोविंद कोळी यांच्या पुण्यतिथीनिमित्त ठाणे महानगरपालिकेच्या वतीने त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे त्यांच्या प्रतिमेला व कोपरीच्या चेंदणी कोळीवाडा येथील त्यांच्या पुतळ्याला महापौर मीनाक्षी राजेंद्र शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला
ठाणे शहरात ४२ हजार ४५२ गणेश मूर्तींचे विसर्जन ठाणे : महापालिकेतर्फे निर्माण केलेल्या पर्यायी गणेश विसर्जन व्यवस्थेतंर्गत दहाव्या दिवशी एकूण १० हजार २६ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.  दीड दिवस, सात दिवस आणि दहा दिवस असे मिळून एकूण ४२ हजार ४५२ मुर्तींचे विसर्जन करण्यात आले. महाराष्ट्रात पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाची संकल्पना यशस्वीपणे राबविणाऱ्या

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language